महानगरपालिकांच्या
पोटनिवडणुकांसाठी 58; तर नगरपरिषदांसाठी 54
टक्के मतदान
जिल्हा
परिषदांच्या पोटनिवडणुकांसाठी 61 टक्के मतदान
मुंबई, दि. 28: विविध सहा महानगरपालिकांमधील नऊ रिक्तपदांच्या
पोटनिवडणुकांसाठी सरासरी 58 आणि नऊ नगरपरिषदांमधील 17 जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 54
टक्के; तर विविध जिल्हा परिषदांमधील चार आणि पंचायत समित्यांमधील तीन रिक्तपदांच्या
पोटनिवडणुकांसाठी सरासरी 61 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य
निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री.
सहारिया यांनी सांगितले की, नागपूर जिल्ह्यातील काटोल नगरपरिषदेतील सर्वाधिक नऊ
जागांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झाले. सर्व ठिकाणी सकाळी 7.30
ते 5.30 अशी मतदानाची वेळ होती. फक्त गडचिरोली जिल्हा परिषदेच्या कढोली सावलखेडा
निवडणूक विभागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी उद्या (ता. 29) मतमोजणी होईल.
महानगरपालिकानिहाय
रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान झालेले प्रभाग: औरंगाबाद- 12 व 21, नाशिक-
36ब व 35ब, ठाणे- 53अ व 32अ, लातूर- 2अ, परभणी- 16ब, आणि धुळे-
34ब.
नगरपरिषदनिहाय
रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान झालेले प्रभाग: जत- 5क, पन्हाळा- 4ड, श्रीगोंदा- 3ब, जामनेर- 1क,
भूम- 4इ, कळमनुरी- 3अ, चांदूरबाजार- 4अ, चिखलदरा- 4ड आणि
काटोल- 1ब, 1ड, 2अ, 2ड, 3ब, 3क, 3ड, 4क व 4ड.
जिल्हा
परिषदनिहाय रिक्तपदांसाठी पोटनिवडणूक होणारे निवडणूक विभाग (कंसात तालुका): सोलापूर- टेंभूर्णा(माढा),
नंदुरबार- रोषमाळ बु, (अक्राणी), अकोला- हातगाव (मूर्तिजापूर) आणि गडचिरोली- कढोली सावलखेडा (कुरखेडा).
पंचायत
समितीनिहाय रिक्तपदांसाठी पोटनिवडणूक होणाऱ्या निर्वाचक गणाचे नाव (कंसात जिल्हा): हवेली (पुणे)-
खेड, कडेगाव (सांगली)- कडेपूर आणि लातूर (लातूर)-
गातेगाव.