Search This Blog

Thursday, December 27, 2018

पाच नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 27 जानेवारी 2019 रोजी मतदान


पाच नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी
27 जानेवारी 2019 रोजी मतदान
मुंबई, दि. 27 (रा.नि..): कर्जत (जि. रायगड), मलकापूर (जि. सातारा), श्रीगोंदा (जि. अहमदनगर), आरमोरी (जि. गडचिरोली) या नगरपरिषदा व महादुला (जि. नागपूर) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 11 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 जानेवारी 2019 रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, 2 ते 9 जानेवारी 2019 या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जातील. नामनिर्देनपत्रांची 10 जानेवारी 2019 रोजी छाननी होईल. मतदान 27 जानेवारी 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत होईल. मतमोजणी 28 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.
पोटनिवडणूक होत असलेली नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय जागा अशी: राजापूर (जि.रत्नागिरी)- 6अ, आळंदी (पुणे)- 9अ, फलटण (सातारा)- 12अ, दुधनी (सोालापूर)- 2ब, पन्हाळा (कोल्हापूर)- 8क, दिंडोरी (नाशिक)- 15, यावल (जळगाव)- 1अ, बीड- 11अ, बुलढाणा- 12ब, अर्जुनी (गोंदिया)- 14, गोरेगाव (गोंदिया)- 14.

Sunday, December 9, 2018

विविध 6 नगरपरिषदांसाठी सरासरी 74.12 टक्के मतदान


विविध 6 नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी
सरासरी 74.12 टक्के मतदानाचा अंदाज
मुंबई, दि. 9 (रानिआ): राज्यातील विविध सहा नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सरासरी 74.12 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, सहापैकी मौदा आणि शेंदुर्णी या दोन नगरपंचायती आहेत. उर्वरित सर्व नगरपरिषदा आहेत. सर्व ठिकाणी आज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. मतमोजणी उद्या (ता. 10) रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
          नगरपरिषद/नगरपंचायत निहाय सरासरी मतदान: नेर- नबाबपूर (जि. यवतमाळ)- 73.15, लोहा (नांदेड)- 86.75,  मौदा (नागपूर)- 77.56, रिसोड (वाशीम)- 68.07,  ब्रम्हपुरी (चंद्रपूर)- 70.52, आणि शेंदुर्णी (जळगाव)- 74.19, एकूण सरासरी- 74.12.

धुळ्यात 60, तर अहमदनगरमध्ये 67 टक्के मतदान


महानगरपालिका निवडणूक 2018
धुळ्यात 60, तर अहमदनगरमध्ये 67 टक्के मतदान
मुंबई, दि. 9 (रानिआ): धुळे व अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुक्रमे सरासरी 60 आणि 67 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
          श्री. सहारिया यांनी सांगितले की, धुळे महानगरपालिकेच्या 19 प्रभागातील एकूण 73 जागांसाठी हे मतदान झाले. एका जागेची निवडणूक बिनविरोध झाली असून एकूण 74 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 5, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव होत्या. अहमदनगर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातील एकूण 68 जागांसाठी मतदान झाले. अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 18 जागा राखीव आहेत. मतमोजणी उद्या (ता. 10) रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.