'जय महाराष्ट्र'मध्ये आज
राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि.1:
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय प्रायोजित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या (दि. २ ऑगस्ट) सायंकाळी ७.३३ वाजता राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांची मुलाखत
प्रसारित होणार आहे.
नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या आगामी निवडणूका व
त्यासाठी सुरू असलेली मतदार जागृती हा या मुलाखतीचा मुख्य विषय आहे. भारत निवडणूक आयोग
व राज्य निवडणूक आयोगातील फरक, निवडणुकांची व्याप्ती, जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भातील बदल,
आचारसंहिता आदी विविध विषयांवरही त्यांनी
सविस्तर माहिती दिली आहे. ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी ही मुलाखत घेतली आहे.