महानगरपालिकांसाठी 9,199 उमेदवार
निवडणूक रिंगणात
पहिल्या टप्प्यातील 15 जि.प.साठी 4,278; तर 165 पं.स.साठी 7,693 उमेदवार
मुंबई, दि. 12: राज्यातील 10
महानगरपालिकांच्या 1 हजार 268 जागांसाठी 9 हजार 199 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत; तसेच पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या 15 जिल्हा
परिषदेच्या 855 जागांसाठी 4 हजार 278; तर 165 पंचायत समित्यांच्या एकूण 1 हजार 712
जागांसाठी 7 हजार 693 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
राज्यातील 10 महानगरपालिकांसाठी 21
फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी दोन
टप्प्यांत मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात 16 फेब्रुवारी 2017 रोजी 15 जिल्हा
परिषदा व त्यांतर्गतच्या 165 पंचायत समित्यांसाठी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात 11
जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 118 पंचायत समित्यांसाठी 21 फेब्रुवारी 2017 रोजी
मतदान होणार आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेचा दोन्ही टप्प्यात समावेश असून पहिल्या
टप्प्यात या जिल्ह्यातील 8; तर दुसऱ्या टप्प्यात
4 पंचायत समित्या व त्यातील निवडणूक विभागांचा समावेश आहे. मतमोजणी मात्र सर्व
ठिकाणी 23 फेब्रुवारी 2017 रोजी होईल.
दुसऱ्या टप्प्यातील 11 जिल्हा
परिषदांच्या 654 जागासांठी छाननीनंतर 6 हजार 367 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. 118
पंचायत समित्यांच्या 1 हजार 288 जागांसाठी 10 हजार 879 नामनिर्देनशपत्रे वैध ठरली
आहेत. काही उमेदवार एकापेक्षा जास्त नामनिर्देशनपत्रे दाखल करतात; परंतु एखाद्याने कितीही नामनिर्देशनपत्रे दाखल केली
असली तरी अंतिमत: प्रत्येकाचा एकच उमेदवारी अर्ज गृहीत धरला जातो. त्यामुळे
नामनिर्देशनपत्रांच्या माघारीच्या अंतिम मुदतीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. ही
मुदत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील नसलेल्या
ठिकाणी 13 फेब्रुवारी 2017; तर अपील असलेल्या
ठिकाणी 15 फेब्रुवारी 2017 पर्यंत असेल.
महानगरपालिकानिहाय (कंसात एकूण
जागा) उमेदवारांची संख्या: बहन्मुंबई (227)- 2,271, ठाणे (131)- 1,134, उल्हासनगर
(78)- 821, नाशिक (122)- 1,089, पुणे (162)- 623, पिंपरी-चिंचवड
(128)- 804, सोलापूर (102)- 478, अकोला (80)- 579, अमरावती
(87)- 626 आणि नागपूर (151)- 774. एकूण (1,268)- 9,199.
पहिल्या टप्प्यात निवडणूक होत
असलेल्या जिल्हा परिषदनिहाय (कंसात एकूण जागा) उमेदवारांची संख्या: अहमदनगर (72)- 303, औरंगाबाद
(62)- 323, बीड (60)- 440, बुलडाणा (60)- 333, चंद्रपूर
(56)- 314, गडचिरोली (35)- 176, हिंगोली (52)- 245, जळगांव
(67)- 244, जालना (56)- 266, लातूर (58)- 231, नांदेड (63)- 374,
उस्मानाबाद (55)- 254, परभणी (54)- 276, वर्धा (50)- 293 आणि यवतमाळ (55)- 306. एकूण जागा (855)- 4,278.
या जिल्हा परिषदांतर्गतच्या 165 पंचायत समित्या (1712)- 7,693.