जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी
प्राथमिक अंदाजानुसार 69 टक्के मतदान
मुंबई, दि.16: राज्यातील 15 जिल्हा
परिषदा आणि 165 पंचायत समित्यांसाठी आज सरसरी 69 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज
आहे. अनेक मतदान केंद्रांवर सांयकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
या 15 जिल्हा परिषदांच्या 855 आणि
165 पंचायत समित्यांच्या 1 हजार 712 जागांसाठी मतदान झाले. या सर्व ठिकाणी सकाळी 7.30
ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ होती. गडचिरोली जिल्ह्यात मात्र सकाळी 7.30 ते
दुपारी 3.00 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती.
प्राथमिक अंदाजानुसार जिल्हानिहाय झालेले
मतदान: अहमदनगर-
70.83, औरंगाबाद- 66.22, बीड- 68.73, बुलडाणा- 67.31, चंद्रपूर-
71.75, गडचिरोली- 71.45, हिंगोली-
72.49, जळगांव- 64.14, जालना- 74.80, लातूर- 70.31, नांदेड-
71.69, उस्मानाबाद- 71.94, परभणी- 74.94, वर्धा- 64.93 आणि यवतमाळ-
70 एकूण सरासरी- 69.