चंद्रपूर, परभणी व लातूर महानगरपालिकेसाठी आज मतदान
प्रत्येक
मतदान केंद्र आदर्शवत करण्याचा प्रयत्न;
यंत्रणा सज्ज
-राज्य
निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 18:
चंद्रपूर, परभणी व लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या
(ता.19) मतदान होत असून 201 जागांसाठी 1 हजार 285 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण
7 लाख 92 हजार 720 मतदारांसाठी 1 हजार 19 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून
प्रत्येक मतदान केंद्र आदर्शवत करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्य निवडणूक
आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, सकाळी 7.30 वाजता मतदानास
सुरूवात होईल. ऊन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदारांच्या सोयीसाठी मतदानाची वेळ
सायंकाळी 5.30 ऐवजी 6.30 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्र
आदर्शवत करण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. मतदान केंद्रांवर पुरेशा सावलीची व
पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. दिव्यांगांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी
रॅम्प, व्हीलचेअरसारख्या सुविधादेखील उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. ऊन्हाचा
तडाखा लक्षात घेऊन प्रथमोपचाराबरोबरच रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
प्रत्येक मतदाराला मतदान करणे सुलभ व्हावे व सुखद अनुभव मिळावा हाच आदर्श मतदान केंद्रांमागचा
मुख्य उद्देश आहे.
आवश्यक तेवढ्या मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यात एक हजार 322 कंट्रोल युनिटचा; तर 4 हजार 284 बॅलेट
युनिटचा समावेश आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी खबरदारीच्या सर्व
उपाययोजना करण्यात आल्या आहेत व पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
तिन्ही ठिकाणी 21 एप्रिल 2017 रोजी मतमोजणी होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर
आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
महानगरपालिका
|
जागा
|
उमेदवार
|
मतदार संख्या
|
मतदान केंद्रे
|
कर्मचारी
|
चंद्रपूर
|
66
|
460
|
3,02,057
|
367
|
2,008
|
लातूर
|
70
|
407
|
2,77,775
|
371
|
2,050
|
परभणी
|
65
|
418
|
2,12,888
|
281
|
1,681
|
एकूण
|
201
|
1,285
|
7,92,720
|
1,019
|
5,739
|