पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगाव महानगरपालिकेसाठी 24 मे रोजी मतदान
26 मे
रोजी मतमोजणी: राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 19: पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगाव महानगरपालिकांच्या
सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मे 2017 रोजी मतदान; तर 26 मे 2017 रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित महानगरपालिकांच्या
क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज.
स. सहारिया यांनी आज येथे केली.
आयोगाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत
होते. आयोगाचे सचिव शेखर चन्ने यावेळी उपस्थित होते. श्री. सहारिया यांनी सांगितले
की, नवनिर्मित पनवेल महानगरपालिकेची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. भिवंडी-निजामपूर
महानगरपालिकेची मुदत 10 जून 2017; तर मालेगाव महानगरपालिकेची
मुदत 14 जून 2017 रोजी संपत आहे. भारत निवडणूक आयोगाने 5 जानेवारी 2017 रोजी
प्रसिद्ध केलेली विधानसभा मतदार संघाची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरली जाणार
आहे.
एकूण 64 प्रभागातील 252 जागांसाठी निवडणूक होत असून इच्छूक
उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध
करून देण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची मुदत 29 एप्रिल 2017 पासून
6 मे 2017 पर्यंत असेल. रविवारी (ता. 30 एप्रिल 2017) नामनिर्देशनपत्रे
स्वीकारण्यात येतील; परंतु 1 मे 2017 च्या सुट्टीच्या
दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत, असेही श्री. सहारिया यांनी
स्पष्ट केले.
निवडणूक कार्यक्रम
·
नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 29 एप्रिल ते 6 मे 2017
·
नामनिर्देशनपत्रांची छाननी- 8 मे 2017
·
उमेदवारी मागे घेणे- 11 मे 2017
·
निवडणूक चिन्ह वाटप- 12 मे 2017
·
उमेदवारांची अंतिम यादी- 12 मे 2017
·
मतदान- 24 मे 2017 (सकाळी 7.30 ते सायं. 5.30)
·
मतमोजणी- 26 मे 2017
महानगरपालिकानिहाय
तपशील
|
||||||||
महानगरपालिका
|
लोकसंख्या
|
मतदार
|
एकूण
जागा
|
महिला
राखीव
|
सर्वसाधारण
|
अनुसूचित
जाती
|
अनुसूचित
जमाती
|
नागरिकांचा
मागास प्रवर्ग
|
पनवेल
|
5,09,901
|
4,25,453
|
78
|
39
|
49
|
6
|
2
|
21
|
भिवंडी-निजामपूर
|
7,09,665
|
4,79,253
|
90
|
45
|
62
|
3
|
1
|
24
|
मालेगाव
|
5,90,998
|
3,91,320
|
84
|
42
|
55
|
4
|
2
|
23
|
एकूण
|
18,10,564
|
12,96,026
|
252
|
126
|
166
|
13
|
5
|
68
|