चंद्रपूर, परभणी व लातूर महानगरपालिकेसाठी 62 टक्के
मतदान
मुंबई, दि. 19: चंद्रपूर, परभणी व लातूर महानगरपालिकेच्या
सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 62 टक्के मतदान झाल्याची
माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, उन्हाची तीव्रता लक्षात
घेऊन या तिन्ही ठिकाणी सायंकाळी 5.30 ऐवजी 6.30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ वाढवून
देण्यात आली होती. चंद्रपूर महानगरपालिकेसाठी 57 टक्के, परभणी महानगरपालिकेसाठी 70
टक्के; तर लातूर महानगरपालिकेसाठी 60
टक्के मतदान झाले. त्याचबरोबर अकोला जिल्हा परिषदेच्या दानापूर निवडणूक विभागाच्या
पोटनिवडणुकीसाठी 47.97 टक्के; तर अकोट (जि. अकोला)
पंचायत समितीच्या कुटासा निर्वाचक गणाच्या पोटनिवडणुकीसाठी 50.18 टक्के मतदान
झाले.