Search This Blog

Thursday, April 27, 2017

80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व 3,909 रिक्त पदांसाठी पोट निवडणूक 27 मे रोजी

80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व 3,909 रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी 27 मे रोजी मतदान
मुंबई, दि. 27: राज्यातील विविध 14 जिल्ह्यांतील 80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 2 हजार 440 ग्रामपंचायतींमधील 3 हजार 909 रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी 27 मे 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी काल येथे केली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, जून ते सप्टेंबर 2017 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या अशा एकूण 80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. 5 ते 12 मे 2017 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. सार्वत्रिक निवडणुकांकरिता नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या नित्रंणाखाली मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना संबंधिताना देण्यात आलेल्या आहेत.
नामनिर्देनपत्रांची 15 मे 2017 रोजी छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 17 मे 2017 पर्यंत राहील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. 27 मे 2017 रोजी मतदान होईल. गडचिरोली जिल्हा वगळता सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत मतदान होईल. केवळ गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते दुपारी 3 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 29 मे 2017 रोजी होईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
जिल्हानिहाय सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या: ठाणे- 4, पालघर- 26, नाशिक- 4, अहमदनगर- 1, पुणे- 22, सातारा- 10, सोलापूर- 4, सांगली- 1, औरंगाबाद- 1, नांदेड- 2, उस्मानाबाद- 1, जालना- 2, वाशीम- 1 व चंद्रपूर- 1. एकूण- 80.
जिल्हानिहाय पोट निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या (कंसात रिक्त पदांची संख्या): ठाणे- 99 (212), पालघर- 66 (132), रायगड- 60 (75), रत्नागिरी- 187 (247), सिंधुदुर्ग- 38 (65), नाशिक- 218 (348), जळगाव- 110 (162), नंदुरबार- 49 (63), पुणे- 359 (603), सातारा- 48 (81), सांगली- 105 (170), कोल्हापूर- 77 (100), औरंगाबाद- 102 (120), नांदेड- 109 (160), उस्मानाबाद- 49 (74), जालना- 73 (86), लातूर- 45 (53), अमरावती- 89 (105), यवतमाळ- 116 (150), बुलडाणा- 72 (88), नागपूर- 46 (84) वर्धा- 63 (87), चंद्रपूर- 46 (80), भंडारा- 60 (103) व गडचिरोली- 154 (451). एकूण- 2440 (3909).

Wednesday, April 26, 2017

हलगर्जी करणाऱ्यांना त्वरित निलंबित करण्याचे आदेश

निवडणूक कामात हलगर्जी करणाऱ्यांना
त्वरित निलंबित करण्याचे आदेश
मुंबई, दि. 26: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्वरित निलंबित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिले.
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्पर्तेमुळेच निवडणुका पार पाडणे शक्य होते; परंतु काही अपवादात्मक कर्मचारी व अधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करतात. अशा कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. सध्या भिवंडी- निजामूपर, मालेगाव आणि पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी आवश्यक तेवढे निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्त उपलब्ध करून देतात; परंतु पनवेल व भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अद्याप आवश्यक तेवढे निवडणूक निर्णय अधिकारी रूज झालेले नाहीत, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी उद्या (ता. 27) रूजू न झाल्यास त्यांना त्वरीत निलंबित करावे व त्यांच्याविरूद्ध प्रशासकीय कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत. पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगाव महानगरपालिकेची निवडणूक 19 एप्रिल 2017 रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी 24 मे 2017 रोजी मतदान होणार आहे.

Friday, April 21, 2017

चंद्रपूर, लातूर व परभणी महानगरपालिका निवडणूक निकाल- 2017


नागभीड नगरपरिषद, रेणापूर, नेवासा, शिराळा व धारणीत 24 मे रोजी मतदान

नागभीड नगरपरिषद, रेणापूर, नेवासा आणि शिराळा नगरपंचायती
व धारणी पंचायत समितीसाठी 24 मे रोजी मतदान
मुंबई, दि. 21: नवनिर्मित नागभीड (जि. चंद्रपूर) नगरपरिषद अध्यक्ष व सदस्य पदांबरोबरच नेवासा (जि. अहमदनगर), रेणापूर (जि. लातूर) व शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच विविध 18 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोट निवडणुकांबरोबरच धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीदेखील 24 मे 2017 रोजी मतदान घेण्यात येईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नगरपरिषदा  व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 28 एप्रिल ते 5 मे 2017 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 6 मे 2017 रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 11 मे 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी अपिलाच्या निर्णयापासून तीन दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 24 मे 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 26 मे 2017 रोजी मतमोजणी होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
जिल्हानिहाय नगरपरिषद व नगरपंचायतींच्या रिक्त पदांच्या पोट निवडणुका: पालघर: जव्हार- 1 क, 3 ब, 4अ, 4 ब व 4 इ, रायगड: मुरुड जंजिरा- 7 अ आणि श्रीवर्धन- 6 अ, रत्नागिरी: चिपळूण- 9 अ, सिंधुदुर्ग: कसई दोडामार्ग- 7, सातारा: मेढा- 3, सोलापूर: दुधनी- 2 अ, नाशिक: देवळा- 14, जळगाव: यावल- 1 ब, नंदुरबार: धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु.- 11, नंदुरबार- 2 क, उस्मानाबाद: उस्मानाबाद- 11 ब, लातूर: औसा- 10 अ आणि अमरावती: अचलपूर- 19 ब.
धारणीचा निवडणूक कार्यक्रम
       धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 4 मे ते 9 मे 2017 या कालावधीत नामनिर्देनपत्रे दाखल करता येतील. 11 मे 2017 रोजी नामनिर्देनपत्रांची छाननी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे 14 मे 2017 पर्यंत अपील करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 16 मे 2017 हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक असेल. अपील असलेल्या ठिकाणी 19 मे 2017 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतदान केंद्रांची यादी 18 मे 2017 रोजी प्रसिद्ध केली जाईल. 24 मे 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची मुदत असेल. 26 मे 2017 रोजी मतमोजणी होईल.

Wednesday, April 19, 2017

चंद्रपूर, परभणी व लातूरमध्ये 62 टक्के मतदान

चंद्रपूर, परभणी व लातूर महानगरपालिकेसाठी 62 टक्के मतदान
मुंबई, दि. 19: चंद्रपूर, परभणी व लातूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 62 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन या तिन्ही ठिकाणी सायंकाळी 5.30 ऐवजी 6.30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली होती. चंद्रपूर महानगरपालिकेसाठी 57 टक्के, परभणी महानगरपालिकेसाठी 70 टक्के; तर लातूर महानगरपालिकेसाठी 60 टक्के मतदान झाले. त्याचबरोबर अकोला जिल्हा परिषदेच्या दानापूर निवडणूक विभागाच्या पोटनिवडणुकीसाठी 47.97 टक्के; तर अकोट (जि. अकोला) पंचायत समितीच्या कुटासा निर्वाचक गणाच्या पोटनिवडणुकीसाठी 50.18 टक्के मतदान झाले.

पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगावात 24 मे रोजी मतदान

पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगाव महानगरपालिकेसाठी 24 मे रोजी मतदान
26 मे रोजी मतमोजणी: राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 19: पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मे 2017 रोजी मतदान; तर 26 मे 2017 रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
आयोगाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयोगाचे सचिव शेखर चन्ने यावेळी उपस्थित होते. श्री. सहारिया यांनी सांगितले की, नवनिर्मित पनवेल महानगरपालिकेची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेची मुदत 10 जून 2017; तर मालेगाव महानगरपालिकेची मुदत 14 जून 2017 रोजी संपत आहे. भारत निवडणूक आयोगाने 5 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभा मतदार संघाची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे.
एकूण 64 प्रभागातील 252 जागांसाठी निवडणूक होत असून इच्छूक उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची मुदत 29 एप्रिल 2017 पासून 6 मे 2017 पर्यंत असेल. रविवारी (ता. 30 एप्रिल 2017) नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील; परंतु 1 मे 2017 च्या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत, असेही श्री. सहारिया यांनी स्पष्ट केले.
निवडणूक कार्यक्रम
·         नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 29 एप्रिल ते 6 मे 2017
·         नामनिर्देशनपत्रांची छाननी- 8 मे 2017
·         उमेदवारी मागे घेणे- 11 मे 2017
·         निवडणूक चिन्ह वाटप- 12 मे 2017
·         उमेदवारांची अंतिम यादी- 12 मे 2017
·         मतदान- 24 मे 2017 (सकाळी 7.30 ते सायं. 5.30)
·         मतमोजणी- 26 मे 2017

महानगरपालिकानिहाय तपशील
महानगरपालिका
लोकसंख्या
मतदार
एकूण जागा
महिला राखीव
सर्वसाधारण
अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती
नागरिकांचा मागास प्रवर्ग
पनवेल
5,09,901
4,25,453
78
39
49
6
2
21
भिवंडी-निजामपूर
7,09,665
4,79,253
90
45
62
3
1
24
मालेगाव
5,90,998
3,91,320
84
42
55
4
2
23
एकूण
18,10,564
12,96,026
252
126
166
13
5
68

Tuesday, April 18, 2017

चंद्रपूर, परभणी व लातूरमध्ये आज मतदान

चंद्रपूर, परभणी व लातूर महानगरपालिकेसाठी आज मतदान
प्रत्येक मतदान केंद्र आदर्शवत करण्याचा प्रयत्न; यंत्रणा सज्ज
                                    -राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 18: चंद्रपूर, परभणी व लातूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता.19) मतदान होत असून 201 जागांसाठी 1 हजार 285 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण 7 लाख 92 हजार 720 मतदारांसाठी 1 हजार 19 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्र आदर्शवत करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरूवात होईल. ऊन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदारांच्या सोयीसाठी मतदानाची वेळ सायंकाळी 5.30 ऐवजी 6.30 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्र आदर्शवत करण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. मतदान केंद्रांवर पुरेशा सावलीची व पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. दिव्यांगांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी रॅम्प, व्हीलचेअरसारख्या सुविधादेखील उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. ऊन्हाचा तडाखा लक्षात घेऊन प्रथमोपचाराबरोबरच रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदाराला मतदान करणे सुलभ व्हावे व सुखद अनुभव मिळावा हाच आदर्श मतदान केंद्रांमागचा मुख्य उद्देश आहे.
आवश्यक तेवढ्या मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात एक हजार 322 कंट्रोल युनिटचा; तर 4 हजार 284 बॅलेट युनिटचा समावेश आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत व पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तिन्ही ठिकाणी 21 एप्रिल 2017 रोजी मतमोजणी होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
महानगरपालिका
जागा
उमेदवार
मतदार संख्या
मतदान केंद्रे
कर्मचारी
चंद्रपूर
66
460
3,02,057
367
2,008
लातूर
70
407
2,77,775
371
2,050
परभणी
65
418
2,12,888
281
1,681
एकूण
201
1,285
7,92,720
1,019
5,739

Monday, April 17, 2017

साडेसहापर्यंत मतदानाची वेळ

चंद्रपूर, परभणी व लातूर महानगरपालिकेसाठी
सायंकाळी साडेसहापर्यंत मतदानाची वेळ
मुंबई, दि.  17: ऊन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदारांच्या सोयीसाठी चंद्रपूर, परभणी व लातूर महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदानाची वेळ सायंकाळी 6.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, चंद्रपूर, परभणी व लातूर या तीन महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होत आहे. त्यासाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली होती; परंतु ऊन्हाच्या तीव्रतेमुळे मतदानाची वेळ वाढवून देण्याची विनंती काही राजकीय पक्षांनी केली होती. त्यानुसार मतदारांना आता सायंकाळी 5.30 ऐवजी सायंकाळी 6.30 पर्यंत मतदानाचा हक्क बजावता येईल. त्याचबरोबर ऊन्हाचा कडाका लक्षात घेता सर्व मतदान केंद्रांवर पुरेशी सावली व पाण्याची व्यवस्थादेखील करण्यात येणार आहे.
अकोल्यातही मतदानाच्या वेळत वाढ
अकोला जिल्हा परिषदेचा दानापूर निवडणूक विभाग आणि अकोट (जि. अकोला) पंचायत समितीच्या कुटासा निर्वाचक गणाच्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होत आहे. या दोन्ही ठिकाणीदेखील उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदानाची वेळ सायंकाळी 5.30 ऐवजी 6.30 वाजेपर्यंत वाढवून देण्यात आली आहे, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.