चित्ररथाद्वारे मतदार जागृतीला
मुंबईत ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि. 31: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत
मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे चित्ररथाद्वारे शहरात
ठिकठिकाणी मतदार जागृती करण्यात येत असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील शिवाजी
पार्कवर झालेल्या संचलनात या चित्ररथाचा समावेश होता. 73 आणि 74 व्या राज्य घटना दुरुस्तीला 25 वर्षे होत असल्याच्या
आणि सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या
पार्श्वभूमीवर हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. सर ज. जी. कला महाविद्यालयाने
त्याची निर्मिती केली आहे. इतर विविध माध्यमांतूनही मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी
प्रयन्त केल जात आहे. चित्ररथ त्याचाच एक भाग आहे. चित्ररथाची आकर्षक रचना व
रंगसंगतीमुळे त्याकडे लक्ष वेधले जात आहे. चित्ररथावर एलएडी पडता असून त्यावर
विविध ध्वनिचित्रफिती व जागृतीपर संदेशही दाखविण्यात येत आहेत.
प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर
संचलन झाल्यानंतर हा चित्ररथ गेट वे ऑफ इंडिया, हजी अली व दादर येथे नेण्यात आला
होता. आज तो वांद्रे (पूर्व) येथे असून या सर्व ठिकाणी नागरिकांचा मोठा प्रतिसाद
लाभला आहे. हा चित्ररथ 6 फेब्रुवारी 2017 पर्यंत मुंबईत असेल त्यानंतर ठाणे
महानगरपालिका निवडणुकीच्या मतदार जागृतीसाठी नेण्यात येईल.
येथे असेल चित्ररथ
1 फेब्रुवारी 2017: बॅन्डस्टँड (वांद्रे पश्चिम)
2 फेब्रुवारी 2017: संजय गांधी
राष्ट्रीय उद्यान (बोरिवली)
3 फेब्रुवारी 2017: जुहू चौपाटी
(सांताक्रुझ)
4 फेब्रुवारी 2017: सागर कुटीर (वर्सोवा चौपाटी)
5 फेब्रुवारी 2017: डायमंड गार्डन (चेंबुर)
6 फेब्रुवारी 2017: मुलुंड
मतदान करा... इतरांनाही सांगा!
चित्ररथाच्या माध्यमातून करण्यात
येत असलेल्या मतदार जागृतीस मुंबईत ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे; परंतु 21 फेब्रुवारी 2017 रोजी
होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी आपण सर्वांनी नक्की मतदान करावे आणि इतरांनाही
मतदानासाठी प्रोत्साहित करावे.
ज. स. सहारिया, राज्य निवडणूक
आयुक्त