Search This Blog

Tuesday, July 31, 2018

‘सांगली- मिरज- कुपवाड’ आणि ‘जळगाव’मध्ये आज मतदान


सांगली- मिरज- कुपवाड’ आणि ‘जळगाव’मध्ये आज मतदान
मुंबई, दि. 31 (रा.नि.आ.): सांगली- मिरज- कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (ता. 1) मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, सांगली- मिरज- कुपवाड व जळगाव या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 3 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. दोन्ही महानगरपालिकेच्या एकूण 153 जागांसाठी 754 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
दोन्ही ठिकाणी एकूण 7 लाख 89 हजार 251 मतदारांसाठी 1 हजार 13 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक तेवढी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 5 हजार 792 अधिकारी/ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, अशीही माहिती श्री. सहारिया यांनी दिली.
एक दृष्टिक्षेप
तपशील
सांगली- मिरज- कुपवाड
जळगाव
एकूण प्रभाग
20
19
जागा
78
75
उमेदवार
451
303
मतदार
4,24,179
3,65,072
मतदान केंद्रे
544
469
कर्मचारी
3,005
2,787