भद्रावती
नगरपरिषदेसाठी
19
ऑगस्ट रोजी मतदान
मुंबई, दि. 20: भद्रावती (जि.
चंद्रपूर) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 19 ऑगस्ट 2018 रोजी मतदान; तर 20
ऑगस्ट 2018 रोजी मतमोजणी होणार आहे. या नगरपरिषदेच्या क्षेत्रात आजपासून
आचारसंहिता लागू झाली आहे.
भद्रावती नगरपरिषदेची मुदत 1
सप्टेंबर 2018 रोजी संपत आहे. त्यामुळे सदस्यपदांसह अध्यक्षपदासाठीदेखील थेट
निवडणूक होईल. नामनिर्देशनपत्रे 26 जुलै ते 1 ऑगस्ट 2018 या कालावधीत स्वीकारली
जातील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.
नामनिर्देशनपत्रांची छाननी 2 ऑगस्ट 2018 रोजी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 8 ऑगस्ट
2018 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येईल. अपील असलेल्या ठिकाणी अपीलाच्या
निर्णयानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान 19
ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत होईल. मतमोजणी 20 ऑगस्ट
2018 रोजी सकाळी 10.00 वाजता सुरू होईल, असे आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले
आहे.