‘सांगली- मिरज- कुपवाड’ आणि ‘जळगाव’मध्ये 57 टक्के मतदान
मुंबई, दि. 1 (रा.नि.आ.): सांगली- मिरज- कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या
सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सरासरी 57 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या
20 प्रभागातील 78 जागांसाठी प्राथमिक अंदाजानुसार 60 टक्के मतदान झाले. जळगाव महानगरपालिकेच्या
19 प्रभागातील 75 जागांसाठी प्राथमिक अंदाजानुसार 55 टक्के मतदान झाले. या दोन्ही ठिकाणी
सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी मतदानाची वेळ होती. सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिकेसाठी
मतमोजणी 3 ऑगस्ट 2018 सकाळी 10 वाजता
सुरू होईल.