26
कोटींची
रोकड व सव्वा लाख लीटर अवैध मद्य जप्त
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी यंत्रणा सज्ज: सहारिया
58
लाख 49 हजार मतदार; तर 7 हजार 641 मतदान
केंद्रांची व्यवस्था
मुंबई, दि. 26: राज्यात पहिल्या टप्प्यातील 164 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी
उद्या (ता. 27) मतदान आहे. त्यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज असून सदस्य
पदांच्या 3 हजार 705 व थेट नगराध्यक्ष पदांच्या
147 जांगासाठी ही निवडणूक होत आहे. मतदारांची एकूण संख्या 58 लाख 49 हजार 171 इतकी
असून त्यासाठी 7 हजार 641 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे; दरम्यान, आचारसंहितेच्या
काळात 26 कोटी 4 लाख 47 हजार 250 रुपयांची रोकड आणि 1 लाख 24 हजार
336 लीटर अवैध मद्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स.
सहारिया यांनी दिली आहे.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, जाहीर
केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात 25 जिल्ह्यांमधील 147
नगरपरिषदा व 18 नगरपंचायतींसाठी (एकूण 165) उद्या मतदान होणार होते; परंतु शिराळा
(जि. सांगली) नगरपंचायतीसाठी एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे
आता 17 नगरपंचायतींसाठी मतदान होईल; तसेच विविध ठिकाणी 28 उमेदवार बिनविरोध
विजयी झाल्यामुळे सदस्य पदाच्या 3 हजार 705 जागांसाठी प्रत्यक्ष
मतदान होईल. त्यासाठी 15 हजार 826 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नगरपरिषदेच्या 147
थेट नगराध्यक्ष पदांसाठी 1 हजार 13 उमेदवारांमध्ये लढत होईल. या सर्व ठिकाणी उद्या
सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 28 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी
10 वाजता मतमोजणीस सुरवात होईल. निकालानंतर संबंधित ठिकाणाची आचारसंहिता संपुष्टात
येईल.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने
पोलिसांनी पुरेशा बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे. गृहरक्षक दलाचे जवानही तैनात
असतील. आवश्यकतेनुसार राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्याही सज्ज ठेवण्यात आल्या
आहेत. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांबाबत पुरेशी काळजी घेतली जाणार
आहे. या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासूनच पोलिसांनी आवश्यक ती सर्व
खबरदारी घेतली आहे. या कालावधीत पोलिसांनी विविध 41 प्रकरणांमध्ये 26 कोटी 4 लाख
47 हजार 250 रुपयांची रोकड जप्त केली आहे. 2 हजार 520 प्रकरणांमध्ये 1 लाख 24 हजार
336 लीटर अवैध मद्यही जप्त केले आहे. त्याचबरोबर संशयित व्यक्तिंविरुद्ध
कार्यवाही, प्रतिबंधात्मक उपाय, नाकाबंधी इत्यादी उपाययोजनाही केल्या आहेत, असेही
श्री. सहारिया यांनी सांगितले.
चौकट (बाईट)
मतदान आवश्य करा…
नगरपरिषदेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने
होत आहे; तसेच नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांची थेट निवडणूक होत आहे. त्यासाठी
प्रत्येक मतदाराला सदस्य पदासाठी दोन ते तीन आणि आणखी एक मत थेट नगराध्यक्षपदाच्या
उमेदवारासाठी द्यायचे आहे. नगरपंचायतींची निवडणूक एक सदस्यीय पद्धतीने होत आहे.
तिथे प्रत्येक मतदाराला केवळ एक मत द्यायचे आहे. त्यासाठी अधिकाधिक संख्येने मतदार
बंधू- भगिनींनी घराबाहेर पडून निर्भीडपणे मतदान करावे आणि लोकशाही बळकट करावी.
श्री. ज. स. सहारिया,
राज्य निवडणूक आयुक्त.
ठळक आकडे
·
एकूण प्रभाग- 1,967
·
सदस्यपदांच्या जागा- 3,705
·
थेट नगराध्यक्षपदांच्या जागा- 147
·
एकूण मतदान केंद्रे- 7,641
·
एकूण मतदार- 58,49,171
·
पुरुष मतदार- 30,20,683
·
स्त्री
मतदार- 28,28,263
·
इतर मतदार- 225
·
सदस्यपदांसाठी उमेदवार- 15,826
·
बिनविरोध
विजयी सदस्य- 28
·
थेट नगराध्यक्ष पदांसाठीचे उमेदवार- 1,013
·
मतदानाची
वेळ- स. 7.30 ते सा. 5.30
·
मतमोजणी-
28 नोव्हेंबर 2016
·
मतमोजणीची
वेळ- सकाळी 10 पासून
ठळक
नोंदी
·
रोकड जप्त- 26,04,47,250
·
अवैध दारु जप्त- 1,24,336
·
अवैध शस्त्रे जप्त- 9
·
आचारसंहिता भंगांच्या तक्रारी- 69
·
मालमत्ता विद्रुपीकरण तक्रारी- 30
·
संशयित व्यक्तिंविरुद्ध कार्यवाही- 16,810
·
शांततेसाठी जामीनपत्रे घेतलेल्या व्यक्ती- 8,741
·
प्रतिबंधात्मक कार्यवाही- 3,173
·
नाकाबंदी- 4,718
पहिल्या टप्प्यात उद्या मतदान होत असलेल्या नगरपरिषदा व
नगरपंचायतींची नावे: पालघर: 1) विक्रमगड
(नवीन न.पं.), 2) तलासरी (नवीन न.पं.) व 3) मोखाडा (नवीन न.पं.). रायगड: 1)
खोपोली, 2) उरण, 3) पेण, 4) अलिबाग, 5) मुरूड-जंजिरा, 6) रोहा, 7) श्रीवर्धन, 8)
महाड, व 9) माथेरान. रत्नागिरी: 1) चिपळूण, 2) रत्नागिरी, 3) दापोली न.पं.,
4) खेड व 5) राजापूर. सिंधुदुर्ग: 1) वेंगुर्ले, 2) सावंतवाडी, 3) मालवण व
4) देवगड-जामसांडे (नवीन न.पं.). सोलापूर: 1) बार्शी, 2) पंढरपूर, 3)
अक्कलकोट, 4) करमाळा, 5) कुर्डूवाडी, 6) सांगोला, 7) मंगळवेढा, 8) मैंदर्गी व 9)
दुधनी. कोल्हापूर: 1) इचलकरंजी, 2) जयसिंगपूर, 3) मलकापूर, 4) वडगाव-कसबा,
5) कुरूंदवाड, 6) कागल, 7) मुरगुड, 8) गडहिंग्लज व 9) पन्हाळा. सांगली: 1)
इस्लामपूर, 2) विटा, 3) आष्टा, 4) तासगाव, 5) कवठे-महांकाळ (नवीन न.पं.), 6)
कडेगाव (नवीन न.पं.) 7) खानापूर (नवीन न.पं.) व 8) पलूस (नवीन नगर परिषद). सातारा:
1) सातारा, 2) फलटण, 3) कराड, 4) वाई, 5) म्हसवड, 6) रहिमतपूर, 7) महाबळेश्वर, 8)
पाचगणी, 9) कोरेगाव (नवीन न.पं.), 10) मेढा (नवीन न.पं.), 11) पाटण (नवीन न.पं.),
12) वडूज (नवीन न.पं.), 13) खंडाळा (नवीन न.पं.)
व 14) दहिवडी (नवीन न.पं.). नाशिक: 1) मनमाड, 2) सिन्नर, 3) येवला,
4) सटाणा, 5) नांदगाव व 6) भगूर. अहमदनगर: 1) संगमनेर, 2) कोपरगाव, 3)
श्रीरामपूर, 4) शिर्डी, 5) रहाता, 6) पाथर्डी, 7) राहुरी व 8) देवळाली प्रवरा. नंदुरबार:
1) शहादा. धुळे: 1) शिरपूर-वरवाडे व 2) दोंडाईचा-वरवाडे. जळगाव: 1)
भुसावळ, 2) चोपडा, 3) अंमळनेर, 4) चाळीसगाव, 5) पाचोरा, 6) यावल, 7) फैजपूर, 8)
सावदा, 9) रावेर, 10) एरंडोल, 11) धरणगाव, 12) पारोळा व 13) बोदवड (नवीन न.पं.). जालना:
1) जालना, 2) भोकरदन, 3) अंबड व 4) परतूर. परभणी: 1) गंगाखेड, 2) सेलू, 3)
जिंतूर, 4) मानवत, 5) पाथरी, 6) सोनपेठ व 7) पूर्णा. हिंगोली: 1) हिंगोली,
2) बसमतनगर व 3) कळमनुरी. बीड: 1) बीड, 2) माजलगाव, 3) परळी-वैजनाथ, 4) अंबेजोगाई,
5) गेवराई व 6) धारूर. उस्मानाबाद: 1) उस्मानाबाद, 2) परांडा, 3) भूम, 4)
कळंब, 5) तुळजापूर, 6) नळदुर्ग, 7) मुरूम व 8) उमरगा. यवतमाळ: 1) यवतमाळ,
2) दिग्रस, 3) पुसद, 4) उमरखेड, 5) वणी, 6) घाटंजी, 7) आर्णी व 8) दारव्हा. अकोला:
1) अकोट, 2) बाळापूर, 3) मूर्तिजापूर, 4) तेल्हारा व 5) पातूर. वाशीम: 1) कारंजा,
2) वाशीम व 3) मंगरूळपीर. अमरावती: 1) अचलपूर, 2) अंजनगावसूर्जी, 3) वरूड,
4) चांदुरबाजार, 5) मोर्शी, 6) शेंदुरजनाघाट, 7) दर्यापूर, 8) चांदूर रेल्वे व 9)
धामणगाव. बुलडाणा: 1) शेगाव, 2) नांदुरा, 3) मलकापूर, 4) खामगाव, 5) मेहकर,
6) चिखली, 7) बुलडाणा, 8) जळगाव-जामोद व
9) देऊळगाव राजा. वर्धा: 1) वर्धा, 2) हिंगणघाट, 3) आर्वी, 4) सिंदी, 5)
पुलगांव व 6) देवळी. चंद्रपूर: 1) बल्लारपूर, 2) वरोरा, 3) मूल, 4) राजुरा
व 5) सिंदेवाही (नवीन न.पं.).