विविध जिल्ह्यांतील 50 ग्रामपंचायतींसाठी 28 डिसेंबरला मतदान
राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि.25: जानेवारी ते
मे 2017 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापन होणाऱ्या विविध जिल्ह्यांतील
50 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 28 डिसेंबर 2016 रोजी मतदान होणार
आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी
सांगितले की, या ग्रामपंचायतींसाठी 6 ते 13 डिसेंबर 2016 या कालावधीत कार्यालयीन
कामकाजाच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत. 14 डिसेंबर 2016 रोजी
छाननी होणार असून 16 डिसेंबर 2016 रोजीपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत
असेल. त्याच दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे प्रसिद्ध करून त्यांना निवडणूक
चिन्हाचे वाटप केले जाईल.
मतदानाच्या दिवशीच म्हणजे तसेच
28 डिसेंबर 2016 रोजी लगेचच मतमोजणी होणार आहे. यासंबंधात मतमोजणीचे ठिकाण व वेळ
संबंधित जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने संबंधित तहसिलदार निश्चित करतील, असेही
श्री. सहारिया यांनी सांगितले.
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची
जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 5, पालघर- 3, रायगड-
1, रत्नागिरी- 1, नाशिक- 10, अहमदनगर- 1, धुळे- 3, नंदुरबार-
1, पुणे- 6, सोलापूर- 2, औरंगाबाद- 1, नांदेड- 2, बीड-
1, अमरावती- 2, यवतमाळ- 3, बुलडाणा- 2, वर्धा- 2, भंडारा-
3 व गडचिराली- 1.