पुणे व लातूर जिल्ह्यातील 14 नगरपरिषदांसाठी 1 हजार 704
नामनिर्देनपत्रे
शंभर टक्के नामनिर्देशनपत्रे संगणक प्रणालीद्वारे
मुंबई, दि.25: नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या दुसऱ्या
टप्प्यात पुणे जिल्ह्यातील 10 व लातूर जिल्ह्यातील 4 अशा एकूण 14 नगरपरिषदांच्या
324 जागांसाठी 1 हजार 704; तर थेट
नगराध्यक्षपदाच्या 14 जागांसाठी एकूण 162 नामनिर्देनपत्रे दाखल झाली आहेत. सर्व म्हणजे शंभर टक्के नामनिर्देनपत्रे संगणकीय प्रणालीद्वारे
प्राप्त झाली आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे
दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, दुसऱ्या टप्प्यातील 14
नगरपरिषदांसाठी 14 डिसेंबर 2016 रोजी मतदान होत आहे. त्यासाठी नामनिर्देनपत्रे
दाखल करण्याची मुदत संपली आहे. नामनिर्देनपत्रे माघारीची अंतिम मुदत 1 डिसेंबर
2016 पर्यंत आहे. त्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल.
पहिल्या टप्प्यात 164
नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी सुमारे 70 टक्के नामनिर्देनपत्रे संगणक
प्रणालीद्वारे प्राप्त झाली होती. पहिल्या टप्प्यात काही ठिकाणी वीज पुरवठा व
इंटरनेट संदर्भात स्थानिक पातळीवर अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्या
लक्षात घेवून कोणीही नामनिर्देशनपत्रे भरण्यासापासून वंचित राहू नये म्हणून
पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशनपत्रे भरण्याची मूभा देण्यात आली होती. दुसऱ्या
टप्प्यासाठी मदत कक्ष, ई-म्युटेशन सुविधा इत्यादी उपाययोजना अधिक प्रभावी करण्यात
आल्या होत्या. त्यामुळे 100 टक्के नामनिर्देशनपत्रे संगणकी प्रणालीद्वारे प्राप्त
झाली आहेत, असे श्री. सहारिया यांनी सांगितले.