Search This Blog

Friday, May 24, 2019

बुटीबोरी नगरपरिषदेसाठी 23 जून रोजी मतदान


बुटीबोरी नगरपरिषदेसाठी
23 जून रोजी मतदान
विविध ठिकाणच्या रिक्तपदांसाठीही मतदान
मुंबई, दि. 24 (रानिआ): नवनिर्मित बुटीबोरी (जि. नागपूर) या नगरपरिषदेची सार्वत्रिक; तसेच विविध नगरपरिषदा/ नगरपंचायतींमधील 23 रिक्तपदाच्या; तर मानवत (जि. परभणी) या नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी 23 जून 2019 रोजी मतदान व 24 जून 2019 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, नामनिर्देशनपत्रे 30 मे 2019 ते 6 जून 2019 या कालावधीत दाखल करता येतील. 2 व 5 जून 2019 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 7 जून 2019 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 13 जून 2019 ही नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाच्या निकालाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे मागे घेता येतील. 23 जून 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 24 जून 2019 रोजी होईल.
नगरपरिषदा/ नगरपंचायतनिहाय पोटनिवडणूक होणाऱ्या रिक्त जागांचा तपशील: बारामती (जि. पुणे)- 5 ब, दुधनी (सोलापूर)- 2 अ, नांदगाव (नाशिक)- 7 ब, देवळा (नाशिक)- 11, श्रीरामपूर (अहमदनगर)- 9 ब, संगमनेर (अहमदनगर)- 10 अ, जामखेड (अहमदनगर)- 14, दोंडाईचा-वरवाडे (धुळे)- 8 अ, सोयगाव (औरंगाबाद)- 16, अंबाजोगाई (बीड)- 4 अ, सोनपेठ (परभणी)- 1 ब, मानवत (परभणी)- अध्यक्ष, हिंगोली (हिंगोली)- 11 ब, जळगाव-जामोद (बुलढाणा)- 8 अ, दारव्हा (यवतमाळ)- 2 अ, मोहाडी (भंडारा)- 4, 9 12, लाखांदूर (भंडारा)- 16, देवरी (गोंदिया)- 11, कोरपना (चंद्रपूर)- 15, मूल (चंद्रपूर)- 6 अ, भामरागड (गडचिरोली)- 5 आणि भामरागड (गडचिरोली)- 16.