विविध
जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील
रिक्तपदांच्या
पोटनिवडणुकांसाठी 23 जूनला मतदान
मुंबई, दि.24 (रानिआ): रायगड,
पुणे, अहमदनगर, हिंगोली, वर्धा, भंडारा व गोंदिया या सात जिल्हा परिषदांमधील नऊ
रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध 16 पंचायत समित्यांमधील 16 रिक्तपदांच्या
पोटनिवडणुकांकरिता 23 जून 2019 मतदान; तर 24 जून 2019 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती
राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या
पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 3 ते 8 जून 2019 या कालावधीत स्वीकारली जातील. 5 जून 2019 रोजी शासकीय सुट्टीमुळे
नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. मतदान 23 जून 2019 रोजी सकाळी 7.30 ते
सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.
पोटनिवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदनिहाय
निवडणूक विभाग असे: रायगड- कळंब (ता. कर्जत), पुणे- बावडा-लाखेवाडी (इंदापूर), अहमदनगर-
बारागाव नांदूर (राहुरी), हिंगोली- येहळेगाव तु. (कळमनुरी), वर्धा-
झडशी (सेलू) व मांडगाव (समुद्रपूर), भंडारा- ब्रम्ही (पवनी) व पालांदपूर
(लाखनी) आणि गोंदिया- आसोली (गोंदिया).
पोटनिवडणूक होणाऱ्या पंचायत
समितीनिहाय निर्वाचक गण असे: पेण (जि. रायगड)- वडखळ, पालघर (पालघर)- खैरापाडा, हवेली
(पुणे)- वाडेबोल्लाई, कागल (कोल्हापूर)- माद्याळ, देवळा (नाशिक)-
महालपाटणे, चाळीसगाव (जळगाव)- मेहुणबारे, नेवासा (अहमदनगर)- सोनई, कर्जत
(अहमदनगर)- कोरेगाव, केज (बीड)- आडस, बिलोली (नांदेड)- अटकळी, माहूर
(नांदेड)- वाई बा, मुखेड (नांदेड)- जांब बु., औंढा ना. (हिंगोली)-
असोला तर्फे लाख, गोरेगाव (गोंदिया)- घोटी, अर्जुनी मोरगाव (गोंदिया)-
माहुरकुडा आणि हिंगणघाट (वर्धा)- वडनेर.
निवडणूक कार्यक्रमाचा
तपशील
·
नामनिर्देशनपत्रे
सादर करणे- 3 ते 8 जून 2019
·
नामनिर्देशनपत्रांची
छाननी- 10 जून 2019
·
अपील नसल्यास
उमेदवारी मागे घेणे- 15 जून 2019
·
अपील असल्यास
उमेदवारी मागे घेणे- 19 जून 2019
·
मतदानाचा
दिनांक- 23 जून 2019
·
मतमोजणीचा
दिनांक- 24 जून 2019