Search This Blog

Friday, May 24, 2019

बुटीबोरी नगरपरिषदेसाठी 23 जून रोजी मतदान


बुटीबोरी नगरपरिषदेसाठी
23 जून रोजी मतदान
विविध ठिकाणच्या रिक्तपदांसाठीही मतदान
मुंबई, दि. 24 (रानिआ): नवनिर्मित बुटीबोरी (जि. नागपूर) या नगरपरिषदेची सार्वत्रिक; तसेच विविध नगरपरिषदा/ नगरपंचायतींमधील 23 रिक्तपदाच्या; तर मानवत (जि. परभणी) या नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी 23 जून 2019 रोजी मतदान व 24 जून 2019 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, नामनिर्देशनपत्रे 30 मे 2019 ते 6 जून 2019 या कालावधीत दाखल करता येतील. 2 व 5 जून 2019 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 7 जून 2019 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 13 जून 2019 ही नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाच्या निकालाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे मागे घेता येतील. 23 जून 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 24 जून 2019 रोजी होईल.
नगरपरिषदा/ नगरपंचायतनिहाय पोटनिवडणूक होणाऱ्या रिक्त जागांचा तपशील: बारामती (जि. पुणे)- 5 ब, दुधनी (सोलापूर)- 2 अ, नांदगाव (नाशिक)- 7 ब, देवळा (नाशिक)- 11, श्रीरामपूर (अहमदनगर)- 9 ब, संगमनेर (अहमदनगर)- 10 अ, जामखेड (अहमदनगर)- 14, दोंडाईचा-वरवाडे (धुळे)- 8 अ, सोयगाव (औरंगाबाद)- 16, अंबाजोगाई (बीड)- 4 अ, सोनपेठ (परभणी)- 1 ब, मानवत (परभणी)- अध्यक्ष, हिंगोली (हिंगोली)- 11 ब, जळगाव-जामोद (बुलढाणा)- 8 अ, दारव्हा (यवतमाळ)- 2 अ, मोहाडी (भंडारा)- 4, 9 12, लाखांदूर (भंडारा)- 16, देवरी (गोंदिया)- 11, कोरपना (चंद्रपूर)- 15, मूल (चंद्रपूर)- 6 अ, भामरागड (गडचिरोली)- 5 आणि भामरागड (गडचिरोली)- 16. 

नवी मुंबईसह 9 महानगरपालिकांतील रिक्तपदांसाठी 23 जून रोजी मतदान


नवी मुंबईसह 9 महानगरपालिकांतील
रिक्तपदांसाठी 23 जून रोजी मतदान
मुंबई, दि. 24 (रानिआ): उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, परभणी व चंद्रपूर या नऊ महानगरपालिकांमधील 15 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 23 जूनला मतदान; तर 24 जून 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, नामनिर्देशनपत्रे 30 मे 2019 ते 6 जून 2019 या कालावधीत दाखल करता येतील. 2 व 5 जून 2019 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 7 जून 2019 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 10 जून 2019 पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 11 जून 2019 रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. 23 मे 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 24 जून 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.
पोटनिवडणुका होणारे महानगरपालिकानिहाय प्रभाग: उल्हासनगर- 1ब आणि 5अ, नवी मुंबई- 29, कल्याण-डोंबिवली- 26, पुणे- 42अ, 42ब (हद्दवाढ क्षेत्रासाठी), आणि 1अ, कोल्हापूर- 28 आणि 55, नाशिक- 10ड, मालेगाव- 6क, परभणी- 11अ आणि 3ड व चंद्रपूर- 6ब आणि 13ब.   

विविध जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जूनला मतदान


विविध जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील
रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जूनला मतदान
मुंबई, दि.24 (रानिआ): रायगड, पुणे, अहमदनगर, हिंगोली, वर्धा, भंडारा व गोंदिया या सात जिल्हा परिषदांमधील नऊ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध 16 पंचायत समित्यांमधील 16 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता 23 जून 2019 मतदान; तर 24 जून 2019 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 3 ते 8 जून 2019 या कालावधीत स्वीकारली जातील. 5 जून 2019 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. मतदान 23 जून 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.
पोटनिवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदनिहाय निवडणूक विभाग असे: रायगड- कळंब (ता. कर्जत), पुणे- बावडा-लाखेवाडी (इंदापूर), अहमदनगर- बारागाव नांदूर (राहुरी), हिंगोली- येहळेगाव तु. (कळमनुरी), वर्धा- झडशी (सेलू) व मांडगाव (समुद्रपूर), भंडारा- ब्रम्ही (पवनी) व पालांदपूर (लाखनी) आणि गोंदिया- आसोली (गोंदिया).
पोटनिवडणूक होणाऱ्या पंचायत समितीनिहाय निर्वाचक गण असे: पेण (जि. रायगड)- वडखळ, पालघर (पालघर)- खैरापाडा, हवेली (पुणे)- वाडेबोल्लाई, कागल (कोल्हापूर)- माद्याळ, देवळा (नाशिक)- महालपाटणे, चाळीसगाव (जळगाव)- मेहुणबारे, नेवासा (अहमदनगर)- सोनई, कर्जत (अहमदनगर)- कोरेगाव, केज (बीड)- आडस, बिलोली (नांदेड)- अटकळी, माहूर (नांदेड)- वाई बा, मुखेड (नांदेड)- जांब बु., औंढा ना. (हिंगोली)- असोला तर्फे लाख, गोरेगाव (गोंदिया)- घोटी, अर्जुनी मोरगाव (गोंदिया)- माहुरकुडा आणि हिंगणघाट (वर्धा)- वडनेर.
        निवडणूक कार्यक्रमाचा तपशील
·         नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 3 ते 8 जून 2019
·         नामनिर्देशनपत्रांची छाननी- 10 जून 2019
·         अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 15 जून 2019
·         अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 19 जून 2019
·         मतदानाचा दिनांक- 23 जून 2019
·         मतमोजणीचा दिनांक- 24 जून 2019

Monday, May 20, 2019

146 ग्रामपंचायतींसाठी 23 जून रोजी मतदान


 146 ग्रामपंचायतींसाठी
23 जून रोजी मतदान
सरपंचपदांच्या 62 रिक्त जागांसाठीही मतदान
मुंबई, दि. 20 (रा.नि.आ.): राज्यातील विविध 20 जिल्ह्यांमधील 146 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 62 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील 6 हजार 719 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जून 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या  ग्रामपंचायतींच्या या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सार्वत्रिकसह सर्व निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 31 मे 2019 ते 6 जून 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. 2 व 5 जून 2019 या दोन सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाही. नामनिर्देशनपत्रांची छाननी 7 जून 2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 10 जून 2019 पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 23 जून 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. सर्व ठिकाणी मतमोजणी 24 जून 2019 रोजी होईल.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: पालघर- 7, रायगड- 8, रत्नागिरी- 1, नाशिक- 74, धुळे- 1, जळगाव- 1, अहमदनगर- 10, पुणे- 3, सातारा- 3, सांगली- 1, कोल्हापूर- 1, उस्मानाबाद- 1, लातूर- 2, नांदेड- 1, अकोला- 1, यवतमाळ- 3, वाशीम- 1, बुलडाणा- 1, वर्धा- 4 आणि चंद्रपूर- 22. एकूण- 146.
पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा: ठाणे- 1, पालघर- 2, रायगड- 10, रत्नागिरी- 5, सिंधुदुर्ग- 1, नाशिक- 3, अहमदनगर- 1, नंदुरबार- 2, पुणे- 3, सोलापूर- 1, सातारा- 6, औरंगाबाद- 4, नांदेड- 8, उस्मानाबाद- 2, परभणी- 1, वाशीम- 5, बुलडाणा- 1, चंद्रपूर- 1 आणि भंडारा- 5. एकूण- 62.

Friday, May 10, 2019

नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 17 मे रोजी प्रारूप मतदार याद्या


नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी
17 मे रोजी प्रारूप मतदार याद्या
मुंबई, दि. 10 (रानिआ): नव्याने स्थापित चंदगड (जि. कोल्हापूर) नगरपंचायत आणि बुटीबोरी (जि. नागपूर) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक; तसेच 22 विविध नगरपरिषदा व नगरपंचायतीतील 24 सदस्यपदांच्या रिक्त जागांसाठी आणि मानवत (जि. परभणी) नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 17 मे 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या निवडणुकांकरिता 10 एप्रिल 2019 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 17 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून त्यावर 21 मे 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 27 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी तसेच मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 29 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. सहारिया यांनी दिली.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा/ नगरपंचायती: चंदगड (जि. कोल्हापूर) आणि बुटीबोरी (जि. नागपूर).
नगरपरिषदा/ नगरपंचायतनिहाय पोटनिवडणूक होणाऱ्या सदस्यपदांच्या रिक्त जागांचा तपशील: बारामती (जि. पुणे)- 5 ब, दुधनी (सोलापूर)- 2 अ, नांदगाव (नाशिक)- 7 ब, देवळा (नाशिक)- 11, श्रीरामपूर (अहमदनगर)- 9 ब, संगमनेर (अहमदनगर)- 10 अ, नेवासा (अहमदनगर)- 13, जामखेड (अहमदनगर)- 14, दोंडाईचा-वरवाडे (धुळे)- 8 अ, सोयगाव (औरंगाबाद)- 16, अंबाजोगाई (बीड)- 4 अ, सोनपेठ (परभणी)- 1 ब, मानवत (परभणी)- अध्यक्ष, हिंगोली (हिंगोली)- 11 ब, जळगाव-जामोद (बुलढाणा)- 8 अ, दारव्हा (यवतमाळ)- 2 अ, मोहाडी (भंडारा)- 4, मोहाडी (भंडारा)- 9, मोहाडी (भंडारा)- 12, लाखांदूर (भंडारा)- 16, देवरी (गोंदिया)- 11, कोपरना (चंद्रपूर)- 15, मूल (चंद्रपूर)- 6 अ, भामरागड (गडचिरोली)- 5 आणि भामरागड (गडचिरोली)- 16,  

महानगरपालिकांच्या पोटनिवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची 17 मेस प्रसिद्धी


महानगरपालिकांच्या पोटनिवडणुकांसाठी
 प्रारूप मतदार याद्यांची 17 मेस प्रसिद्धी
मुंबई, दि. 10 (रानिआ): बृहन्मुंबई, उल्हासनगर, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, चंद्रपूर आणि कल्याण-डोंबिवली या महानगरपालिकांमधील 20 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता 17 मे 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या निवडणुकांकरिता 10 एप्रिल 2019 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 17 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून त्यावर 21 मे 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 27 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 29 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशी माहितीही श्री. सहारिया यांनी दिली.
महानगरपालिकानिहाय पोटनिवडणूक होणारे प्रभाग: पुणे- 42अ, 42ब (हद्दवाढ क्षेत्रासाठी), 24ब आणि 1अ, उल्हासनगर- 1ब आणि 5अ, नाशिक- 10 ड, परभणी- 11अ आणि 3ड, मालेगाव- 6क, चंद्रपूर- 6ब आणि 13ब, कोल्हापूर- 28 आणि 55, कल्याण-डोंबिवली- 26, नवी मुंबई- 29, बृहन्मुंबई- 32, 28, 76 आणि 81.   

जि.प. आणि पं.स.च्या पोटनिवडणुकांसाठी 17 मे रोजी प्रारूप मतदार याद्या


जि.प. आणि पं.स.च्या पोटनिवडणुकांसाठी
17 मे रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी
मुंबई, दि. 10 (रानिआ): राज्यातील विविध 7 जिल्हा परिषदांमधील 9; तर 12 पंचायत समित्यांमधील 16 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार याद्या 17 मे 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या निवडणुकांकरिता 10 एप्रिल 2019 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 17 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून त्यावर 21 मे 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय अंतिम मतदार याद्या 27 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी तसेच मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 29 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशी माहितीही श्री. सहारिया यांनी दिली.
पोटनिवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदनिहाय निवडणूक विभाग असे: रायगड- कळंब (ता. कर्जत), पुणे- बावडा-लाखेवाडी (इंदापूर), अहमदनगर- बारागाव नांदूर (राहुरी), हिंगोली- येहळेगाव तु. (कळमनुरी), वर्धा- झडशी (सेलू) व मांडगाव (समुद्रपूर), भंडारा- ब्रम्ही (पवनी) व पालांदपूर (लाखनी) आणि गोंदिया- आसोली (गोंदिया).
पोटनिवडणूक होणाऱ्या पंचायत समितीनिहाय निर्वाचक गण असे: पेण (जि. रायगड)- वडखळ, पालघर (पालघर)- खैरापाडा, हवेली (पुणे)- वाडेबोल्लाई, कागल (कोल्हापूर)- माद्याळ, देवळा (नाशिक)- महालपाटणे, चाळीसगाव (जळगाव)- मेहुणबारे, नेवासा (अहमदनगर)- सोनई, कर्जत (अहमदनगर)- कोरेगाव, केज (बीड)- आडस, बिलोली (नांदेड)- अटकळी, माहूर (नांदेड)- वाई बा, मुखेड (नांदेड)- जांब बु., औंढा ना. (हिंगोली)- असोला तर्फे लाख, गोरेगाव (गोंदिया)- घोटी, अर्जुनी मोरगाव (गोंदिया)- माहुरकुडा आणि हिंगणघाट (वर्धा)- वडनेर.