39 ग्रामपंचायतींसाठी
सरासरी 82 टक्के मतदान
मुंबई, दि.28: राज्यातील
विविध 15 जिल्ह्यांमधील 39 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक
अंदाजानुसार आज सरासरी 82 टक्के मतदान झाले.
सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30
वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठिकाणी
आजच मतमोजणीस सुरवात झाली. मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 5, पालघर- 3, रायगड- 1, नाशिक-
9, अहमदनगर- 1, धुळे- 1, नंदुरबार- 1, पुणे- 6, औरंगाबाद-
1, नांदेड- 1, बीड- 1, यवतमाळ- 3, बुलढाणा- 2, वर्धा-
2 आणि भंडारा- 2. एकूण- 39.