Search This Blog

Thursday, January 2, 2020

रत्नागिरीतील ग्रामपंचायतींसाठी 6 फेब्रुवारीला मतदान

रत्नागिरीतील पाच ग्रामपंचायतींसाठी
6 फेब्रुवारी रोजी मतदान
मुंबई, दि. 2 (रा.नि.आ.): रत्नागिरी जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या सुकवली, बहिरवली, चौगुले मोहल्ला, रजवेल आणि शिर्शी या पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 6 फेब्रुवारी 2020 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2020 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
श्री. मदान यांनी सांगितले की, मुदत संपणाऱ्या या पाच ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशनपत्रे 16 ते 21 जानेवारी 2020 या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 22 जानेवारी 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 24 जानेवारी 2020 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 6 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 7 फेब्रुवारी 2020 रोजी होईल.