बृहन्मुंबईतील प्रभाग क्रमांक 21 व 62 च्या
पोटनिवडणुकीसाठी 13 डिसेंबरला मतदान
मुंबई, दि.07: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या
प्रभाग क्रमांक 21 आणि 62 च्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 13 डिसेंबर 2017
रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज
येथे केली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की,
या पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 20 ते 27 नोव्हेंबर 2017 या कालावधीत
स्वीकारण्यात येतील. त्यांची छाननी 28 नोव्हेंबर 2017 रोजी होईल. 30 नोव्हेंबर 2017
पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. निवडणूक चिन्हांचे वाटप 2 डिसेंबर 2017 रोजी
होईल. मतदान 13 डिसेंबर 2017 रोजी होईल. मतमोजणी 14 डिसेंबर 2017 रोजी होईल.