Search This Blog

Tuesday, May 23, 2017

भिवंडी- निजामपूर, मालेगाव व पनवेलमध्येआज मतदान

भिवंडी- निजामपूर, मालेगाव व पनवेल महानगरपालिकेसाठी आज मतदान
नागभीड, नेवासा, रेणारपूर, शिराळा आणि धारणीतही मतदान
मुंबई, दि. 23: भिवंडी- निजामपूर, मालेगाव व पनवेल महानगरपालिका, धारणी पंचायत समिती, नागभीड नगरपरिषद आणि नेवासा, रेणापूर व शिराळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध 7 नगरपरिषदांतींल 11 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उद्या (ता. 24) मतदान होत आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली आहे.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 26 मे 2017 रोजी मतमोजणी होईल. तिन्ही महानगरपालिकेच्या एकूण 252 जांगांसाठी 1 हजार 251 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण 12 लाख 96 हजार 026 मतदारांसाठी 1 हजार 730 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक तेवढी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात 2 हजार 291 कंट्रोल युनिट; तर 7 हजार 143 बॅलेट युनिटचा समावेश आहे.
नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान
नवनिर्मित नागभीड (जि. चंद्रपूर) नगरपरिषदेचे अध्यक्ष व सदस्य पदांबरोबरच नेवासा (जि. अहमदनगर), रेणापूर (जि. लातूर) व शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान होईल. चारही ठिकाणी प्रत्येकी 17 जागा आहेत. एकूण 68 जागांसाठी 276 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 58 हजार 794 मतदार असून मतदानाची संपूर्ण तयारी झाली आहे. जव्हार, श्रीवर्धन, चिपळूण, कसई-दोडामार्ग, धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु., औसा आणि अचलपूर या 7 नगरपरिषद/ नगरपंचायतींतील एकूण 11 रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठीदेखील उद्या मतदान होईल, असे ते म्हणाले.
 ‘धारणीतही तयारी पूर्ण
        धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीदेखील उद्या मतदान होत आहे. एकूण दहा जागांसाठी 32 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 1 लाख 1 हजार 316 मतदारांसाठी 146 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही श्री. सहारिया यांनी दिली.

महानगरपालिका निवडणुकांबाबत तपशील
महानगरपालिका
लोकसंख्या
मतदार
जागा
उमेदवार
मतदान केंद्रे
कर्मचारी
पनवेल
5,09,901
4,25,453
78
418
570
3,242
भिवंडी-निजामपूर
7,09,665
4,79,253
90
460
644
4,028
मालेगाव
5,90,998
3,91,320
84
373
516
3,425
एकूण
18,10,564
12,96,026
252
1,251
1,730
10,695