Search This Blog

Wednesday, May 24, 2017

भिवंडी- निजामपूर, मालेगाव व पनवेलमध्ये सरासरी 55 टक्के मतदान

भिवंडी- निजामपूर, मालेगाव व पनवेलमध्ये सरासरी 55 टक्के मतदान
नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी 73; तर धारणीत 42 टक्के मतदान
मुंबई, दि. 24: भिवंडी- निजामपूर, मालेगाव आणि पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सरासरी 55 टक्के, नगरपरिदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोट निवडणुकांसाठी सरासरी 73.4 टक्के; तर धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 42 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, भिवंडी- निजापूर महानगरपालिकेसाठी 53, मालेगाव महानगरपालिकेसाठी 60; तर पनवेल महानगरपालिकेसाठी 53 टक्के मतदान झाले. नागभीड (जि. चंद्रपूर)  नगरपरिषदेसाठी 71.5, नेवासा (जि. अहमदनगर) नगरपंचायतीसाठी 81.4, रेणापूर (जि. लातूर) नगरपंचायतीसाठी 76.7; तर शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतीसाठी 87.5 टक्के असे एकूण सरासरी 77.9 टक्के मतदान झाले. याशिवाय  जव्हार, श्रीवर्धन, चिपळूण, कसई-दोडामार्ग, धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु., औसा आणि अचलपूर या 7 नगरपरिषद/ नगरपंचायतींतील एकूण 11 रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी सरासरी 61 टक्के मतदान झाले. नगरपरिषदा आणि नगरपरिषदांच्या सार्वत्रिक आणि पोट निवडणुकांसाठी एकत्रित सरासरी 73.4 टक्के मतदान झाले. त्याचबरोबर धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीदेखील आज मतदान झाले. येथे एकूण दहा जागांसाठी सरासरी 42 टक्के मतदान झाले. या सर्व ठिकाणी 26 मे 2017 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरवात होईल.