Search This Blog
Friday, May 26, 2017
Wednesday, May 24, 2017
भिवंडी- निजामपूर, मालेगाव व पनवेलमध्ये सरासरी 55 टक्के मतदान
भिवंडी- निजामपूर, मालेगाव व पनवेलमध्ये सरासरी 55 टक्के मतदान
नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी 73; तर
धारणीत 42 टक्के मतदान
मुंबई, दि. 24: भिवंडी- निजामपूर, मालेगाव आणि पनवेल
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सरासरी 55 टक्के, नगरपरिदा आणि
नगरपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोट निवडणुकांसाठी सरासरी 73.4 टक्के; तर धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी
42 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.
स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, भिवंडी-
निजापूर महानगरपालिकेसाठी 53, मालेगाव महानगरपालिकेसाठी 60; तर पनवेल महानगरपालिकेसाठी 53 टक्के मतदान झाले. नागभीड
(जि. चंद्रपूर) नगरपरिषदेसाठी 71.5, नेवासा (जि. अहमदनगर) नगरपंचायतीसाठी 81.4, रेणापूर (जि. लातूर) नगरपंचायतीसाठी 76.7; तर शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतीसाठी 87.5 टक्के असे
एकूण सरासरी 77.9 टक्के मतदान झाले. याशिवाय जव्हार,
श्रीवर्धन, चिपळूण, कसई-दोडामार्ग, धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु., औसा आणि अचलपूर या 7
नगरपरिषद/ नगरपंचायतींतील एकूण 11 रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी सरासरी 61
टक्के मतदान झाले. नगरपरिषदा आणि नगरपरिषदांच्या सार्वत्रिक आणि पोट निवडणुकांसाठी
एकत्रित सरासरी 73.4 टक्के मतदान झाले. त्याचबरोबर धारणी पंचायत समितीच्या
सार्वत्रिक निवडणुकीसाठीदेखील आज मतदान झाले. येथे एकूण दहा जागांसाठी सरासरी 42
टक्के मतदान झाले. या सर्व ठिकाणी 26 मे 2017 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरवात
होईल.
Tuesday, May 23, 2017
भिवंडी- निजामपूर, मालेगाव व पनवेलमध्येआज मतदान
भिवंडी- निजामपूर, मालेगाव व पनवेल महानगरपालिकेसाठी आज मतदान
नागभीड, नेवासा, रेणारपूर, शिराळा आणि धारणीतही मतदान
मुंबई, दि. 23: भिवंडी- निजामपूर, मालेगाव व पनवेल महानगरपालिका, धारणी पंचायत समिती, नागभीड
नगरपरिषद आणि नेवासा, रेणापूर व शिराळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध 7 नगरपरिषदांतींल 11 रिक्त पदांच्या
पोटनिवडणुकांसाठी उद्या (ता. 24) मतदान होत आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज
झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली आहे.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या
सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 26 मे 2017 रोजी
मतमोजणी होईल. तिन्ही महानगरपालिकेच्या एकूण 252 जांगांसाठी 1 हजार 251 उमेदवार
निवडणूक रिंगणात आहेत. एकूण 12 लाख 96 हजार 026 मतदारांसाठी 1 हजार 730 मतदान
केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक तेवढी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे
उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात 2 हजार 291 कंट्रोल युनिट; तर 7 हजार 143 बॅलेट युनिटचा समावेश आहे.
नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान
नवनिर्मित नागभीड (जि.
चंद्रपूर) नगरपरिषदेचे अध्यक्ष व सदस्य पदांबरोबरच नेवासा (जि. अहमदनगर), रेणापूर (जि. लातूर) व
शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान होईल. चारही ठिकाणी प्रत्येकी 17 जागा आहेत. एकूण 68 जागांसाठी 276 उमेदवार निवडणूक रिंगणात
आहेत. 58 हजार 794 मतदार असून मतदानाची संपूर्ण तयारी झाली आहे. जव्हार, श्रीवर्धन, चिपळूण, कसई-दोडामार्ग,
धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु., औसा आणि अचलपूर या 7 नगरपरिषद/ नगरपंचायतींतील एकूण 11
रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठीदेखील उद्या मतदान होईल, असे ते म्हणाले.
‘धारणी’तही तयारी पूर्ण
धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीदेखील उद्या मतदान होत आहे.
एकूण दहा जागांसाठी 32 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 1 लाख 1 हजार 316
मतदारांसाठी 146 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही श्री.
सहारिया यांनी दिली.
महानगरपालिका निवडणुकांबाबत तपशील
|
||||||
महानगरपालिका
|
लोकसंख्या
|
मतदार
|
जागा
|
उमेदवार
|
मतदान केंद्रे
|
कर्मचारी
|
पनवेल
|
5,09,901
|
4,25,453
|
78
|
418
|
570
|
3,242
|
भिवंडी-निजामपूर
|
7,09,665
|
4,79,253
|
90
|
460
|
644
|
4,028
|
मालेगाव
|
5,90,998
|
3,91,320
|
84
|
373
|
516
|
3,425
|
एकूण
|
18,10,564
|
12,96,026
|
252
|
1,251
|
1,730
|
10,695
|
'जय महाराष्ट्र'मध्ये आज राज्य निवडणूक आयुक्त
'जय महाराष्ट्र'मध्ये आज
राज्य निवडणूक आयुक्त
मुबंई, दि. 23: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दूरदर्शनच्या
सह्याद्री वीहिनीवरील 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या (ता. 23) रोजी सायंकाळी 7.30 वाजता राज्य
निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
राज्यातील तीन महानगरपालिका, चार नगरपरिषदा/ नगरपंचायती आणि धारणी पंचायत समितीच्या
सार्वत्रिक निवडणुकीसाठी 24 मे, तर 80 ग्रामपंचयतींच्या
सार्वत्रिक निवडणूकांसाठी 27 मे 2017 रोजी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही
मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी ही
मुलखात घेतली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)