केंद्रीय
शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या
शिक्षकांना
निवडणूक कर्तव्यातून सूट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात
तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्यानंतर 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या
125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतदानाच्या तारखेत बदल
करण्यात आला. त्यानुसार आता 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान
होणार आहे. त्याच वेळी राज्यातील काही शिक्षकांची सी-टीईटी परीक्षा असल्यामुळे
संबंधित शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट देऊन, पर्यायी व्यवस्था करण्याबाबत
संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.