Search This Blog

Monday, November 10, 2025

राज्य निवडणूक आयुक्तांची विशेष मुलाखत

 जय महाराष्ट्र आणि दिलखुलास कार्यक्रमात राज्य निवडणूक आयुक्तांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. 10 (रानिआ): माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दूरदर्शनवरील जय महाराष्ट्र कार्यक्रमात 11 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजता; तसेच आकाशवाणीवरील दिलखुलास कार्यक्रमात 12, 13, 14 व 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7.25 वाजता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

निवेदक मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे. जय महाराष्ट्र कार्यक्रमातील मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरदेखील उपलब्ध होईल. दिलखुलास कार्यक्रमातील मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येईल; तसेच ती ‘News on AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध असेल.

राज्यातील स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांची सध्या लगबग सुरू आहे. पहिल्या टप्प्यात 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान आणि 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात श्री. वाघमारे यांच्याशी या मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत समाजमाध्यम हँडल्स्‌

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR