विविध 6 नगरपरिषदा/
नगरपंचायतींसाठी
सरासरी 74.12 टक्के मतदानाचा अंदाज
मुंबई, दि. 9 (रानिआ): राज्यातील विविध सहा नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या अध्यक्ष
व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सरासरी 74.12 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक
अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, सहापैकी मौदा आणि शेंदुर्णी
या दोन नगरपंचायती आहेत. उर्वरित सर्व नगरपरिषदा आहेत. सर्व ठिकाणी आज सकाळी 7.30 ते
सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. मतमोजणी उद्या (ता. 10) रोजी सकाळी 10 वाजता सुरू
होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
नगरपरिषद/नगरपंचायत निहाय सरासरी मतदान: नेर- नबाबपूर (जि. यवतमाळ)- 73.15, लोहा (नांदेड)- 86.75, मौदा (नागपूर)-
77.56, रिसोड (वाशीम)- 68.07, ब्रम्हपुरी
(चंद्रपूर)- 70.52, आणि शेंदुर्णी (जळगाव)-
74.19, एकूण सरासरी- 74.12.