ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्यांची
18 एप्रिल रोजी प्रसिद्धी
मुंबई, दि. 3: विविध जिल्ह्यांतील
जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित सुमारे 670 ग्रामपंचायतींच्या
सार्वत्रिक; तसेच रिक्तपदांच्या
पोटनिवडणुकांसाठी 18 एप्रिल 2018 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात
येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, विधानसभा मतदार
संघाच्या 10 जानेवारी 2018 रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी
ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याआधारावर ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या
18 एप्रिल 2018 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 18 ते 23 एप्रिल 2018 या
कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार याद्या 25 एप्रिल 2018 रोजी
प्रसिद्ध होतील.