बृहन्मुंबईसह 7 महानगरपालिकांतील
रिक्तपदांसाठी 6 एप्रिलला मतदान
मुंबई, दि. 7: बृहन्मुंबई, नाशिक, सोलापूर, जळगाव,
पुणे, अहमदनगर व उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी
6 एप्रिलला मतदान; तर
7 एप्रिल 2018 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया
यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, नामनिर्देशनपत्रे
13 ते 20 मार्च 2018 या कालावधीत दाखल करता येतील. 18 मार्च 2018 रोजी शासकीय सुट्टीमुळे
नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 21 मार्च 2018 रोजी नामनिर्देशनपत्रांची
छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 23 मार्च 2018 पर्यंत असेल.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 24 मार्च 2018 रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील.
6 एप्रिल 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 7 एप्रिल
2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.
पोटनिवडणुका होणारे महानगरपालिकानिहाय
प्रभाग: बृहन्मुंबई- 173, नाशिक- 13-क, सोलापूर- 14-क,
जळगाव- 26-ब, पुणे- 22-क, अहमदनगर- 32-ब
आणि उल्हासनगर- 17-ब.