Search This Blog

Thursday, July 28, 2016

पोटनिवडणुकांसाठी 28 ऑगस्ट 2016 रोजी मतदान

महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या रिक्तपदांच्या
पोटनिवडणुकांसाठी 28 ऑगस्ट 2016 रोजी मतदान

           मुंबई, दि. 28: विविध सात महानगरपालिकांमधील दहा रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी; तसेच विविध जिल्हा परिषदांमधील पाच आणि पंचायत समित्यांमधील चार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 28 ऑगस्ट 2016 रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
           श्री. सहारिया यांनी सांगितले की, महानगरपालिकांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 2 ते 9 ऑगस्ट 2016 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत 12 ऑगस्ट 2016 पर्यंत असेल. 28 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान होईल. दुसऱ्या दिवशी 29 ऑगस्ट 2016 रोजी मतमोजणी होईल.
          जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 8 ते 12 ऑगस्ट 2016 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. नामनिर्देशनासंदर्भात अपील नसलेल्या ठिकाणी 22 ऑगस्ट 2016; तर  अपील नसलेल्या ठिकाणी 24 ऑगस्ट 2016 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 28 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान होईल. दुसऱ्या दिवशी 29 ऑगस्ट 2016 रोजी मतमोजणी होईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
          महानगरपालिकानिहाय रिक्तपदांसाठी पोटनिवडणूक होणारे प्रभाग: औरंगाबाद- 12 व 21, नाशिक- 36ब व 35ब, ठाणे- 53अ व 32अ, लातूर- 2अ, परभणी- 16ब, अमरावती- 32ब आणि धुळे- 34ब.
          जिल्हापरिषदनिहाय रिक्तपदांसाठी पोटनिवडणूक होणारे निवडणूक विभाग (कंसात तालुका): सातारा- नागठाणे (सातारा), सोलापूर- टेंभूर्णा(माढा), नंदुरबार- रोषमाळ बु, (अक्राणी), अकोला-  हातगाव (मूर्तिजापूर) आणि  गडचिरोली- कढोली सावलखेडा (कुरखेडा).
       पंचायत समितीनिहाय रिक्तपदांसाठी पोटनिवडणूक होणाऱ्या निर्वाचक गणाचे नाव (कंसात जिल्हा): हवेली (पुणे)- खेड, कडेगाव (सांगली)- कडेपूर, लातूर (लातूर)- गातेगाव आणि जाफ्राबाद (जालना)- हिवरा बळी.