नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी
31 ऑगस्टपर्यंत मतदार यादी नावे नोंदवावित
-राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 30: राज्यात डिसेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या 195 व 1९
नवनिर्मित नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान
करण्यासाठी पात्र नागरिकांनी 31 ऑगस्ट 2016 पर्यंत विधानसभा मतदारसंघाच्या मतदार
यादीत आपली नावे नोंदवावीत किंवा मतदार यादीत आपल्याशी संबंधित तपशिलांत
दुरुस्त्या असल्यास त्या कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया
यांनी आज येथे केले.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, विधानसभा
मतदारसंघाची मतदार यादी भारत निवडणूक आयोगातर्फे तयार केली जाते. तीच स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाते. नगरपरिषद व नगरपंचायतींच्या
आगामी निवडणुकांसाठी 10 सप्टेंबर 2016 रोजी अस्तित्त्वात येणारी विधानसभा
मतदारसंघाची मतदार यादी वापरली जाणार आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2016 रोजी किंवा
तत्पूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या पात्र नागरिकांनी 31 ऑगस्ट 2016 पर्यंत
विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविणे आवश्यक आहे. तरच त्यांना
नगरपरिषद व नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांमध्ये मतदान करता येईल; तसेच यापूर्वीच मतदार यादीत नावे असलेल्या मतदारांच्या
नावांत किंवा पत्त्यांतील तपशिलात बदल असल्यास त्यासाठीदेखील अर्ज करता येईल.
त्याचबरोबर दुबार नावे, स्थलांतरितांची नावे अथवा मृत व्यक्तींची नावे
वगळण्यासाठीसुद्धा अर्ज करता येईल. त्यासाठीच्या अर्जांचे नमुने मतदार नोंदणी
केंद्र; तसेच मुख्य निवडणूक अधिकारी व
राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
मतदार नोंदणीचा विषय भारत निवडणूक
आयोगाच्या कार्यकक्षेतला असला तरी कुठलीही पात्र व्यक्ती नगरपरिषद व
नगरपंचायतींच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहू नये याकरिता राज्य निवडणूक
आयोगाने मतदार जागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. सध्या भारत निवडणूक आयोगातर्फे
राष्ट्रीय मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रम (NERP) राबविला जात आहे. त्याचे औचित्य साधून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राज्य
निवडणूक आयोगाने संबंधित नगरपरिषद व नगरपंचायतींच्या क्षेत्रात व्यापक प्रमाणात
जनजागृती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी; तसेच नगरपरिषद व नगरपंचायतींना दिले आहेत. त्याचबरोबर सर्व स्तरांवर मतदार
नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे, आपापल्या क्षेत्रातील महाविद्यालयांच्या
प्राचाऱ्यांच्या बैठका घेऊन विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्येच मतदार नोंदणी
अर्ज स्वीकृती केंद्र सुरू करणे; तसेच नागरिकांसाठी नगरपरिषद,
नगरपंचायतींच्या क्षेत्रांत आवश्यक तेवढे मतदार अर्ज स्वीकृती केंद्र सुरु करण्याबाबतही
सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती श्री. सहारिया यांनी दिली.
नोव्हेंबर- डिसेंबर 2016 मध्ये निवडणूक होणाऱ्या जिल्हानिहाय नगरपरिषद व नगरपंचायतींची
नावे: रायगड- उरण, पनवेल, खोपोली, पेण, अलिबाग, मुरुड-जंजिरा, रोहा, श्रीवर्धन, महाड,
माथेरान गिरीस्थान. रत्नागिरी- दापोली न.पं., खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर. सिंधूदूर्ग-
वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, देवगड- जामसांडे न.प. (नवनिर्मित). पालघर- विक्रमगड न.पं. (नवनिर्मित), मोखाडा न.पं. (नवनिर्मित),
तलासरी न.पं. (नवनिर्मित). पुणे- जुन्नर,
तळेगाव-दाभाडे, लोणावळा, शिरुर, आळंदी, दौंड, सासवड, जेजुरी, इंदापूर, बारामती. सांगली-
आष्टा, विटा, तासगाव, इस्लामपूर, पलूस नगरपरिषद (नवनिर्मित), कवठे-महाकाळ न.पं.
(नवनिर्मित), कडेगाव न.पं. (नवनिर्मित), खानापूर न.पं. (नवनिर्मित), शिराळा न.पं.
(नवनिर्मित). सातारा-
वाई, फलटण, म्हसवड, रहिमतपूर, कराड, सातारा, महाबळेश्वर गिरीस्थान, पाचगणी
गिरीस्थान, कोरेगाव न.पं. (नवनिर्मित), मेढा न.पं. (नवनिर्मित), पाटण न.पं.
(नवनिर्मित), वडूज न.पं. (नवनिर्मित), खंडाळा न.पं. (नवनिर्मित), दहिवडी न.पं.
(नवनिर्मित). सोलापूर- करमाळा, कुर्डूवाडी, बार्शी, पंढरपूर, सांगोला,
मंगळवेढे, अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी. कोल्हापूर- वडगाव, इचलकरंजी,
जयसिंगपूर, कुरुंदवाड, कागल, मुरगुड, गडहिंग्लज, पन्हाळा गिरीस्थान, मलकापूर. नाशिक-
सटाणा, नांदगाव, मनमाड, भगूर, सिन्नर, येवला. अहमदनगर- कोपरगाव, शिर्डी
न.प., राहता, श्रीरामपूर, राहुरी, देवळी-प्रवरा, संगमनेर, पाथर्डी. धुळे- शिरपूर-वरवडे,
दोंडाईचा-वरवडे. नंदूरबार- शहादा. जळगाव-
चोपडा, यावल, फैजपूर, सावदा, रावेर, भुसावळ, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, पारोळा,
चाळीसगाव, पाचोरा, बोदवड न.पं. (नवनिर्मित). औरंगाबाद- कन्नड, वैजापूर, गंगापूर, पैठण,
खुलाताबाद. जालना- भोकरदन, जालना, अंबड, परतूर. परभणी-
मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा, सेलू, जिंतूर. नांदेड- माहूर
नगरपंचायत, अर्धापूर नगरपंचायत, उमरी, धर्माबाद, हदगाव, मुदखेड, कुंडलवाडी, बिलोली,
कंधार, देगलूर, मुखेड. हिंगोली- हिंगोली, कळमनुरी, बसमतनगर. बीड-
गेवराई, माजलगाव, बीड, किल्लेधारुर, परळी, आंबेजोगाई. लातूर- निलंगा,
उदगीर, औसा, अहमदपूर. उस्मानाबाद- भूम, कळंब,
नळदुर्ग, मुरुम, उमरगा, परांडा, उस्मानाबाद, तुळजापूर. अमरावती- अंजनगाव सुर्जी, मोर्शी, वरुड,
शेंदुरजना घाट, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, चांदूरबाजार, दर्यापूर. अकोला-
अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा, बाळापूर, पातूर. बुलढाणा- जळगाव-जामोद,
शेगाव, नांदुरा, मलकापूर, खामगाव, मेहकर, चिखली, बुलढाणा, देऊळगाव-राजा. वाशीम-
कारंजा, वाशीम, मंगरुळपीर. यवतमाळ- यवतमाळ, दिग्रस, पुसद, उमरखेड, घाटंजी,
वणी, आर्णी, दारव्हा. नागपूर- नरखेड,
कळमेश्वर, मोहपा, सावनेर, रामटेक, उमरेड, कामठी, खापा, काटोल. वर्धा- देवळी, आर्वी, सिंदी
रेल्वे, पुलगाव, हिंगणघाट, वर्धा. भंडारा- पवनी, भंडारा, तुमसर, साकोली
नगरपरिषद (नवनिर्मित). गोंदिया- तिरोरा, गोंदिया. चंद्रपूर- मूल,
राजुरा, बल्लारपूर, वरोरा, नागभिड नगरपरिषद, (नवनिर्मित) सिंदेवाही न पं
(नवनिर्मित) गडचिरोली- देसाईगंज, गडचिरोली.
चौकट
· मतदार
म्हणून नाव नोंदणे- नमुना क्र. 6
· मतदार
यादीतील नाव वगळणे- नमुना क्र. 7
· नाव
व अन्य तपशिलांत दुरुस्ती - नमुना क्र. 8
· मतदारसंघ अंतर्गत पत्ता बदलविणे- नमुना 8 अ