विविध जिल्ह्यांतील 547 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार 76 टक्के मतदान
Search This Blog
Sunday, September 18, 2022
547 ग्रामपंचायतींसाठी 76 टक्के मतदान
Thursday, September 15, 2022
ग्रामपंचायत महिला सदस्य प्रशिक्षण
मुंबई, दि. 15 (रानिआ): ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्हीही गावाच्या विकासात योगदान देऊ शकतो आणि डिजिटल कारभारातही आम्ही मागे राहणार नाही. सरपंचासाठी असलेल्या डिजिटल सहीचा दक्षतापूर्व व प्रभावीपणे वापरू, असा आत्मविश्वास राज्यातील ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षणानंतर अनेक महिला सदस्यांनी व्यक्त केला.
विविध जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार ग्रामपंचायतीच्या जानेवारी 2021 मध्ये निवडणुका पार पडल्या. यात सुमारे 16 हजार महिला सदस्य निवडून आल्या होत्या. त्यांना ग्रामपंचायतीच्या कारभाराची माहिती व्हावी, या उद्देशाने ‘पंचायत कारभार परिचय’ प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. राज्य निवडणूक आयोग, इंस्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन फॉर गुड गर्व्हनन्स, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हल्पमेंट या संस्थांच्यावतीने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.
महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे चालविण्यात येणाऱ्या बचत गटातील 80 महिलांची प्रारंभी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांना रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हल्पमेंटकडून प्रशिक्षण देण्यात आले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुकास्तरावरील बचत गटांच्या फेडरेशनच्या (सीएमआरसी) माध्यमातून ग्रामपंचायत महिला सदस्यांशी गावपातळीवर समन्वय साधण्यात आला. त्यामाध्यमातून ऑनलाईन पद्धतीने हे प्रशिक्षण देण्यात आले. तांत्रिक सुविधांचा आभाव असलेल्या ठिकाणी ऑफलाईन पध्दतीने प्रशिक्षण देण्यात आले. एकूण 500 बॅचेसच्या माध्यमातून 16 हजार महिला सदस्यांना हे प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य होते. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली.
प्रशिक्षणानंतर अनेक ग्रामपंचायत महिला सदस्यांनी प्रसिक्षणासंदर्भात उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. “ग्रामपंचायतीचा कारभार, सभा- बैठका, ग्रामविकास समित्या, अर्थव्यवस्थापन, ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्याच्या जबाबदाऱ्या, सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे कर्तव्ये इत्यादीसंदर्भातील सर्वंकष माहिती अत्यंत सोप्या भाषेत या प्रशिक्षणामुळे मिळू शकली,” असे जळगाव जिल्ह्यातील श्रीमती आशा जाधव यांनी सांगितले. “मी सरपंच असून माझ्या मनात डिजिटल सहीसंदर्भात काही प्रश्न होते. त्यांची अत्यंत सुलभपणे प्रशिक्षणात उत्तरे मिळाली. त्यामुळे मी आता लक्षपूर्वक आणि प्रभावीपणे डिजिटल सहीचा वापर करू शकेल,” अशी प्रतिक्रिया यवतमाळ जिल्ह्यातील वैशाली पाटील यांनी व्यक्त केली.
“पंचायत कारभार परिचय प्रशिक्षणामुळे ग्रामपंचायत महिला सदस्य अधिक प्रभावीपणे काम करू शकतील व ग्रामविकासात मोलाची भूमिका बजावू शकतील. त्यांच्यातील नेतृत्व गुणांना अधिक प्रोत्साहन मिळेल. त्यांना पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा,” अशा शब्दांत राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी प्रशिक्षणाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
Wednesday, September 7, 2022
थेट सरपंचपदांसह 1,166 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला मतदान
थेट सरपंचपदांसह 1,166 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला मतदान
मुंबई, दि. 7 (रानिआ): विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 14 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित तहसीलदार 13 सप्टेंबर 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 21 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे 24 व 25 सप्टेंबर 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 28 सप्टेंबर 2022 होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत.
विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या: ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79. पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70. रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1. रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10. सिंदुदुर्ग: दोडामार्ग- 2 व देवडगड- 2. नाशिक: इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71. नंदुरबार: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81. पुणे: मुळशी- 1 व मावळ- 1. सातारा: जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6. कोल्हापूर: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1. अमरावती: चिखलदरा- 1. वाशीम: वाशीम- 1. नागपूर: रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8. वर्धा: वर्धा- 2 व आर्वी- 7. चंद्रपूर: भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1. भंडारा: तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1. गोंदिया: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2. गडचिरोली: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1. एकूण- 1,166.