Search This Blog
Wednesday, October 6, 2021
Tuesday, October 5, 2021
पोटनिवडणुकांसाठी 63 टक्के मतदान
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 63 टक्के मतदान
मुंबई, दि. 5 (रानिआ): धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्हा
परिषदांतील 84; तर त्यांतर्गतच्या 38 पंचायत
समित्यांतील 141 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 63
टक्के मतदान झाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या
38 पंचायत समित्यांतील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात
आली होती. त्यामुळे या 6 जिल्हा परिषदेच्या 85 निवडणूक विभागांची आणि पंचायत समित्यांच्या
144 निर्वाचक गणांतील जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी धुळे जिल्हा परिषदेच्या एका
आणि शिरपूर (जि. धुळे) पंचायत समितीच्या दोन; तर अक्कलकुवा (जि. नंदुरबार) पंचायत समितीच्या एका जागेवरची पोटनिवडणूक बिनविरोध
झाली. उर्वरित जागांसाठी आज मतदान झाले. सर्व ठिकाणी उद्या (ता.6) सकाळी 10 वाजता मतमोजणी
सुरू होईल.
प्राथमिक माहितीनुसार जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी: धुळे- 60, नंदुरबार- 65, अकोला- 63, वाशीम- 65, नागपूर- 60 आणि पालघर- 65. एकूण सरासरी- 63.
प्राथमिक माहितीनुसार जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी: धुळे- 60, नंदुरबार- 65, अकोला- 63, वाशीम- 65, नागपूर- 60 आणि पालघर- 65. एकूण सरासरी- 63.
Subscribe to:
Posts (Atom)