Search This Blog
Monday, June 24, 2019
Saturday, June 1, 2019
नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम जि.प.च्या प्रारूप मतदार यादीची 7 जून रोजी प्रसिद्धी
नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम जि.प.च्या
प्रारूप मतदार यादीची 7 जून रोजी प्रसिद्धी
हरकतींसाठी 12 जूनपर्यंत मुदत
मुंबई, दि. 1 (रानिआ): नागपूर,
धुळे, नंदुरबार, अकोला व वाशीम या पाच जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 36 पंचायत
समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जून 2019 रोजी प्रारूप मतदार यादी
प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर 12 जून 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील,
अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या
निवडणुकांकरिता 10 एप्रिल 2019 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार
याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या निवडणूक विभाग व
निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 7 जून 2019 रोजी प्रसिद्ध
केल्या जातील. त्या दिवसापासून त्यावर 12 जून 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता
येतील. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय अंतिम मतदार याद्या 18 जून 2019 रोजी
प्रसिद्ध केल्या जातील. त्याच दिवशी मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय
मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार
याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार
याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन
नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे
इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व
सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या
चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या
यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशी माहितीही श्री.
सहारिया यांनी दिली.
Subscribe to:
Posts (Atom)