Search This Blog

Thursday, January 31, 2019

सिल्लोड नगरपरिषदेसाठी 27 फेब्रुवारीला मतदान


सिल्लोड नगरपरिषदेसाठी
27 फेब्रुवारीला मतदान
मुंबई, दि. 31 (रा.नि..): सिल्लोड (जि. औरंगाबाद) नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 27 फेबुवारी 2019 रोजी मतदान होणार असून त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, 5 ते 12 फेब्रुवारी 2019 या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जातील. 9 व 10 फेब्रुवारी 2019 या शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देनपत्रांची छाननी 13 फेब्रुवारी 2019 रोजी होईल. मतदान 27 फेबुवारी 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत होईल. मतमोजणी 28 फेबुवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.